Maharashtra Corona Update : राज्यात आज साडे तीन हजार रुग्ण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात 3 हजार 500 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर, 3 हजार 145 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19 लाख 84 हजार 768 एवढी झाली आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 18 लाख 81 हजार 088 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज घडीला राज्यात 52 हजार 152 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

https://twitter.com/rajeshtope11/status/1350096983529201666?s=19

राज्यात आजपर्यंत तब्बल 50 हजार 336 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आज दिवसभरात 45 रुग्ण दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.54 टक्के एवढा आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.78 टक्के एवढं झाले आहे.

आजवर राज्यात 1 कोटी 36 लाख 84 हजार 589 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 19 लाख 84 हजार 768 नमूने सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 24 हजार 851 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 240 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.