Maharashtra : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पसरतेय डोळ्यांची साथ; पुण्यासह इतर जिल्ह्यात हजारो रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रात सर्वत्र डोळे लागणची (Maharashtra) साथ पसरली असून सर्वांनी आपल्या डोळ्यांची योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. सर्वप्रथम महाराष्ट्रात आळंदी येथे डोळे लागणची साथ मोठ्या प्रमाणात पसरली होती. आळंदीमध्ये डोळे लागणच्या रुग्ण संख्येने 5000 चा आकडा गाठला होता. तर त्यानंतर मुंबई आणि पुण्यासह, लातूर, ठाणे, कोल्हापूर जिल्ह्यात डोळ्यांची मोठ्या प्रमाणात साथ पसरली आहे.

लातूरमध्ये 4 हजारांहून अधिक जणांना डोळे आले असून सोलापूरात पाच हजारांची रुग्ण संख्या गाठली आहे. यासोबतच गोव्यात सर्दी खोकल्याच्या साथी सोबत डोळ्यांच्या साथीने गोवेकर फार हैराण झाले आहेत. महाराष्ट्रात डोळ्यांच्या साथीचे प्रमाण वाढत आहे. तर इतर जिल्ह्यात 50-60 अशा संख्येने रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

पावसाळा सुरू झाला, की साथीचे आजार वाढतात. त्यामुळे (Maharashtra) प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे असते. शाळा, कॉलेज आणि ऑफिस या ठिकाणी डोळ्यांच्या रुग्णांनी येऊ नये, जास्तीत जास्त संपर्क टाळावा आणि जवळच्या आरोग्य केंद्रात, दवाखान्यात डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार घ्यावेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.