Maharashtra Lockdown : रेड झोन वगळता राज्यातील लॉकडाऊन एक जूननंतर शिथिल होण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – राज्यातील सध्याचे निर्बंध शिथिल करण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. राज्य सरकार रेड झोनमधील जिल्हे वगळता इतर जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याच्या विचारात आहे. पुढच्या पाच ते सहा दिवसात काय परिस्थिती असेल हे पाहून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या बघूनच लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. रेड झोन जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आठवड्याभर आढावा घेऊन जिल्हानिहाय त्याबाबत निर्णय घेतले जातील. रेड झोनमधील जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झाली नाही तर कडक लॉकडाऊन कायम राहणार आहे, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘कालच्या माहितीप्रमाणे राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तिथले निर्बंध सरसकट शिथिल करता येणार नाहीत. कन्टेन्मेंट झोन करुन तिथे नियम कडक करावे लागतील तर जिथे रुग्ण संख्या कमी तिथे नियम शिथिल करावे लागतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.