Maharashtra Lockdown : राज्यातील लॉकडाऊन 15 मेपर्यंत कायम; अधिक कठोर निर्बंध लागू

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन 15 मेपर्यंत कायम ठेवण्यात आले असून कठोर निर्बंध जारी करण्यात आले आहेत.

राज्यात 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 15 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यासाठी शासनाच्या वतीनं नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले असून राज्यांतर्गत प्रवासासाठी ई पासची गरज लागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, फक्त अंत्यसंस्कार, मेडिकल इमर्जन्सी आणि अत्यावश्यक सेवेसाठीच प्रवास करता येणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.