Maharshtra : मोसमी वारे दाखल झाले विदर्भात

एमपीसी न्यूज – बंगालच्या उपसागरातील मोसमी पावसाची (Maharshtra) शाखा अधिक वेगाने वाटचाल करीत आहे. त्यामुळे मोसमी वारे विदर्भापर्यंत पोहचले आहे,अशी माहिती   हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.मॉन्सूनने शुक्रवारी आंध्र प्रदेश, ओडिशा तसेच पश्‍चिम बंगाल, बंगालच्या उपसागराचा संपूर्ण भाग व्यापला आहे. त्याचबरोबर झारखंड, बिहार, कर्नाटक, तेलंगणाच्या काही भागांसह महाराष्ट्रात पूर्व विदर्भ, पूर्व उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड येथील काही भागात प्रगती केली आहे.

PCMC : उपायुक्त स्मिता झगडे विनापरवाना परदेश दौऱ्यावर,  आयुक्तांचे शासनाला पत्र

विदर्भात हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात गोंदियात 15 मिमी, नागपुरात 12  मिमी आणि अमरावीत 7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी अकोल्यात 39.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

विदर्भातील अन्य जिल्ह्यांतील तापमानात घट झाली आहे. 27 जूनपर्यंत कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा आहे.

हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या मॉन्सूनची सीमा रत्नागिरी, विजापूर, निजामाबाद ते सिद्धार्थनगरपर्यंत असून अरबी समुद्रावरून मात्र मॉन्सूनची प्रगती अद्याप अडखळत सुरू आहे.

यातच आता पुढील प्रगतीसाठी पोषक स्‍थिती पाहता मॉन्सून पुढील चार दिवसांमध्ये म्हणजेच मंगळवारपर्यंत राज्याच्या अजून काही भागांमध्ये दाखल होण्याची चिन्हे (Maharshtra)आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.