PCMC : उद्यान विभागातील लाच प्रकरणी उप लेखापालाचेही निलंबन

एमपीसी न्यूज – दोन फर्मचे ऑडिट रिपोर्ट अनुकूल देण्यासाठी (PCMC) आणि उद्यानाच्या केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी 17 हजार रूपयांची लाच घेण्यासाठी सहाय्यक उद्यान निरीक्षकाला प्रोत्साहन देणाऱ्या पालिकेच्या उपलेखापालाचेही निलंबन करण्यात आले आहेत. तसेच त्याची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत.

Maharshtra : मोसमी वारे दाखल झाले विदर्भात

संजय देवराम काळभोर असे निलंबित केलेल्या उप लेखापालाचे नाव आहे. पिंपरी महापालिकेच्या उद्यान विभागात सहाय्यक उद्यान निरीक्षक या पदावर किरण मांजरे काम करत होते. मांजरे यांनी एका ठेकेदाराला दोन फर्मचे ऑडिट रिपोर्ट अनुकूल देण्यासाठी आणि उद्यानाच्या केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी 17 हजार रूपयांची लाच मागितली.

17 हजार रूपयांची लाच घेताना मांजरे यांना 8 जूनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नेहरूनगर येथे रंगेहाथ पकडले होते.

त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकही करण्यात आली आहे. त्यानंतर मांजरे यांना पालिका सेवेतून निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले आहेत.

मात्र, मांजरे यांना लाच घेण्यासाठी उपलेखापाल काळभोर यांनी प्रोत्साहन दिल्याचे लाच लुचपत विभागाच्या चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे एसबीने काळभोर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यामुळे काळभोर यांचे पालिका सेवेतून निलंबन करण्यात आले (PCMC) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.