Maharashtra : राज्य नाट्य स्पर्धेच्या नियमावलीत कोणताही बदल नाही

एमपीसी न्यूज – राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य (Maharashtra) संचालनालयाने राज्य नाट्य स्पर्धेच्या नियमावलीत कोणताही बदल केलेला नाही, असे सांस्कृतिक कार्य संचालनालय, सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाने म्हटले आहे की, शासन निर्णय 26 ऑगस्ट 1992 रोजीच्या नियमावलीनुसार 5 (इ) (4) मध्ये म्हटले आहे की, ‘नाट्य संस्थेस, शासनाकडून सुचविण्यात आल्यास, नाटकातील काही भाग किंवा वाक्ये गाळावी लागतील’, असा उल्लेख आहे.

Ajit Pawar : छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बु. आणि तुळापूर येथील स्मारक विकासाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

सन1992 मध्ये जी नियमावली अस्तित्वात आली होती, तीच नियमावली, आहे त्या स्वरूपात अस्तित्वात आहे. त्यामध्ये संचालनालयाच्या स्तरावरून कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.