Akurdi News : महेश लाकाळ यांचे कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज – एम थ्री टोटल सोल्यूशन जाहिरात एजन्सीचे संचालक महेश लाकाळ यांचे आज (शुक्रवारी) पहाटे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.

लाकाळ आकुर्डी येथे वास्तव्यास होते. त्यांनी दैनिक लोकमतमध्ये जाहिरात विभागात मॅनेजर म्हणून काम केले. त्यानंतर एम थ्री टोटल सोल्यूशन जाहिरात एजन्सी सुरु केली होती. नाट्यपरिषदेचे सदस्य देखील होते. लाकाळ यांना कोरोनाची लागण झाली होती. मागील दीड महिन्यांपासून चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला.

निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.