Chinchwad : मनोज लोहिया छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त, डॉ. संजय शिंदे यांना सह आयुक्त पदी बढती; वसंत परदेशी नवे अपर आयुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांना सह आयुक्त पदावर बढती मिळाली असून त्यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पदस्थापना करण्यात आली आहे. तर वसंत परदेशी यांची अपर पोलीस आयुक्त पदी बढतीने बदली झाली आहे.(Chinchwad) पिंपरी-चिंचवडचे सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांची छत्रपती संभाजीनगर  येथे पोलीस आयुक्त पदावर बदली झाली आहे.

राज्याच्या गृह विभागाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या केल्या आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक श्रेणीतील भारतीय पोलीस सेवेतील 12 अधिकाऱ्यांना बढती मिळाली आहे. तर दोन अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांना बढती देऊन त्यांची पदोन्नतीने पिंपरी-चिंचवड येथेच सह पोलीस आयुक्त पदावर पदस्थापना केली आहे. डॉ. संजय शिंदे यांनी अपर पोलीस आयुक्त असताना दोन टप्प्यातील भरतीची संपूर्ण जबाबदारी सांभाळली आहे. तसेच त्यांनी अनेक गुन्हेगारांवर कठोर कारवाया देखील केलेल्या आहेत.

Pune : अस्पायर एफसीचे तिसरे विजेतेपद

तर पिंपरी-चिंचवडचे सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांची बदली झाली आहे. त्यांची छत्रपती संभाजीनगर, पोलीस आयुक्त पदावर बदली झाली आहे. (Chinchwad) डिसेंबर 2022 मध्ये मनोज लोहिया यांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक पदावरून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली झाली होती. त्यानंतर चार महिन्यात त्यांना आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पोलीस उप महानिरीक्षक श्रेणीतील पदावरील राज्यातील दहा भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यात राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सात, दौंड येथे समादेशक पदावर कार्यरत असलेले वसंत परदेशी यांची पिंपरी चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त म्हणून बढतीवर पदस्थापना करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.