Maratha Seva Sangh : विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यामुळेच मराठा सेवा संघाचा जगभरात विस्तार – गंगाधर बनवरे

एमपीसी न्यूज – मराठा सेवा संघाची कार्यबीजे रोवण्यामध्ये छत्रपती शिवाजी व राजर्षी शाहू महाराज यांचे आदर्श पाठीशी असल्याने या संघटनेचा जगभरात विस्तार होऊ शकला,(Maratha Seva Sangh) असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते व मराठा सेवा संघाचे प्रवक्ते गंगाधर बनवरे यांनी केले.

पिंपरी येथील संत तुकारामनगर शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त मराठा सेवा संघ पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष प्राचार्य रामकिशन पवार होते.(Maratha Seva Sangh) संयोजक व मराठा सेवा संघाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे, माजी महापौर योगेश बहल, सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजू दुबल, उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव, माजी नगरसेवक शाम लांडे, सुलक्षणा शिलवंत-धर, जितेंद्र ननावरे, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा जगताप यावेळी उपस्थित होते.

Pimpri News : महापालिका सेवांचे वितरण सुधारण्यासाठी फेलोज “इनवॉर्ड्स प्रकल्प” उपयुक्त ठरेल – शेखर सिंह

गंगाधर बनवरे पुढे म्हणाले, ”आम्ही विचार देणारे लोक आहोत. कष्ट करा, हिताच्या दृष्टीने वाटचाल करावी. जग मुठीत घेता येईल, एवढी ताकद प्रत्येक मानसात आहे. संघटनेत यावे. मराठा सेवा संघाने भाषण चळवळ वाढविली. वक्ते, लेखक तयार केले. आपल्याघरी देवघर असावे की नसावे हा प्रत्येकाचा वैयक्तीक मुद्दा आहे. पण, तुम्ही माणूस असाल तर पुस्तकाचे कपाट 100 टक्के तुमच्या घरात असले पाहिजे,(Maratha Seva Sangh) हे सांगणारा मराठा सेवा संघ आहे. मुले, मुली पुस्तके वाचतील आणि क्रांतिकारक बनतील. आज लोकशाही जवळपास संपुष्टात आली आहे. गेल्या सात ते आठ वर्षामध्ये देशाचे अर्थकारण बिघडले आहे. सगळीकडे खासगीकरण झाले आहे. बँकांमधील पैसे सुरक्षित नाहीत”.

पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘एमपीसी न्यूज’चे सहयोगी संपादक अनिल कातळे यांचा सन्मान

मराठा सेवा संघाचे पिंपरी-चिंचवडचे संस्थापक सदस्य व पिंपरी महापालिकेचे निवृत्त सहाय्यक आयुक्त अमृतराव सावंत यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.(Maratha Seva Sangh) एमपीसी न्यूजचे सहयोगी संपादक अनिल कातळे, प्रकाश गायकर (पत्रकारिता), विनायक पाटील, मोहन पवार (वैद्यकीय) देवेंद्र बाबर (उद्योजक) किशोर ढोकळे (कामगार नेता), संजय दातीर (वकिली) यांना मराठा भूषण तर सामाजिक कार्यकर्ते, व लेखक विजय जगताप यांचा ‘मराठा मित्र पुरस्कार’ देऊन माजी महापौर योगेश बहल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यकर्ता सन्मान पुरस्कार म्हणून मराठा समाजाबरोबरच विविध धर्मीय मंडळींचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. त्यामध्ये सुभाष देसाई, विजय शिंदे, जयसिंग सासवडे, सुरेश इंगळे, मोहन जगताप, श्रीमती सुलभा यादव, विजय गायकवाड, सुहास कोळी, सुरेखा कामठे यांना गौरविण्यात आले. प्राचार्य रामकिशन पवार यांनी, उपेक्षित घटक म्हणून आता मराठा कुटुंबियांची संख्या समाजाच्या एकूण लोकसंख्येच्या 40 टक्के इतकी असून मराठा आरक्षण का आवश्यक आहे? याची विस्तृत माहिती त्यांनी दिली.

यावेळी योगेश बहल, प्रकाश जाधव, राजू दुबल यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ॲड लक्ष्मण रानवडे यांनी केले. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.(Maratha Seva Sangh) तर, गोविंद खामकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी वाल्मिक माने, सचिन दाभाडे, प्रविण कदम, अशोक सिसोदे, अशोक सातपुते, प्रकाश बाबर, ॲड. सुनीलरानवडे,  सुनिता शिंदे, माणिक शिंदे, जितेंद्र महामुनी यांनी पुढाकार घेतला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.