Pune – विवाहितेचा छळ करून सासरच्यांनी केले आत्महत्येस प्रवृत्त

एमपीसी न्युज – विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून पती व त्याचा घरच्यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा प्रकार चंदननगर येथे घडला आहे. याप्रकरणी आकाश वनस्कर (वय 25, रा. चंदननगर) यांनी फिर्याद दिली आहे.

आरती प्रवीण वाघमारे ( वय 20) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे

प्रवीण लक्ष्मण वाघमारे(वय 25), लक्ष्मण गंगाराम वाघमारे(वय 48), सचिन लक्ष्मण वाघमारे(वय 21) व एक महिला ( वय 40) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश यांची बहीण आरतीचे लग्न प्रवीण सोबत झाल्यानंतर आरतीला सासरी नांदत काही दिवसांनीच प्रवीण आणि त्याच्या घरच्यांनी मिळून आरतीला  नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून 2 लाख रुपयांची मागणी केली तसेच तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. आरतीने या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी पती प्रवीण आणि त्याच्या सोबत आणखी तिघांना अटक केली असून पुढील तपास चंदन नगर पोलीस करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.