Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज कोरोनाचे 138 नवीन रुग्ण; 80 जणांना डिस्चार्ज

मावळ तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 2 हजार 848 झाली आहे.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (शुक्रवारी, दि. 11) कोरोनाचे 138 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 2 हजार 848 झाली आहे. तर दिवसभरात 80 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 92 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 46 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये सोमाटणे 13, कामशेत 6, कान्हे 4, कुसगाव बु. 3, इंदोरी, उंबरे नवलाख, कार्ला, गोवित्री येथील प्रत्येकी 2, वराळे, कुरवंडे, डोंगरगाव, धामणे, सुदवडी, दहिवली, जांभूळ, नायगाव, चिखलसे, बेबडओहळ, जोवण, कुसगाव खु. येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 54, लोणावळा शहरात 23 आणि वडगावमध्ये 15 रुग्ण आढळले आहेत.

एकूण 2 हजार 848 रुग्णांमध्ये सध्या 832 रुग्ण सक्रीय आहेत. तर 1 हजार 913 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 939, लोणावळा नगरपरिषद 500 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 179 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 1 हजार 230 रुग्ण आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.