Maval Corona Update : मावळ तालुक्यात गुरुवारी 27 नवीन रुग्ण; 43 जणांना डिस्चार्ज

कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 551 झाली आहे.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (गुरुवारी, दि. 20) कोरोनाचे 27 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 551 झाली आहे. तर दिवसभरात 43 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज दिवसभरात दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले रुग्ण आंबेवाडी कान्हे मावळ (पुरुष, 60 वर्ष), बेबडओहळ (पुरुष, 102 वर्ष) येथील आहेत.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 16 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 11 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये सोमटणे 3, वराळे 2, शिरगाव 2, कामशेत, बऊर, भोयरे, वडीवले येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 25 लोणावळा शहरात 9 आणि वडगावमध्ये 2 रुग्णाची नोंद झाली आहे.

एकूण 1 हजार 551 रुग्णांमध्ये सध्या 343 रुग्ण सक्रीय आहेत. तर 1 हजार 150 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 58 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 509, लोणावळा नगरपरिषद 169 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 117 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 756 रुग्ण आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.