Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज कोरोनाचे 78 नवीन रुग्ण; एकट्या लोणावळ्यात एकाच दिवसात 42 रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (मंगळवारी, दि. 8) कोरोनाचे 78 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 2 हजार 469 झाली आहे. तर दिवसभरात 36 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. लोणावळा शहरात मंगळवारी एकाच दिवसात 42 रुग्ण आढळले आहेत. यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मंगळवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. हे रुग्ण कामशेत (पुरुष, 50 वर्ष), (पुरुष, 67 वर्ष), लोणावळा (पुरुष, 77 वर्ष) येथील होते.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 58 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 20 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये कामशेत पाच, माळवाडी 3, इंदोरी, उंबरे नवलाख, काले येथील प्रत्येकी 2, टाकवे बु, धामणे, दारुंब्रे, नाणे, लोहगड, ब्राह्मणवाडी करंजगाव येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 16, लोणावळा शहरात 42 रुग्ण आढळले आहेत. वडगावमध्ये आज एकही रुग्णाची नोंद नाही.

एकूण 2 हजार 469 रुग्णांमध्ये सध्या 639 रुग्ण सक्रीय आहेत. तर 1 हजार 732 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 98 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 806, लोणावळा नगरपरिषद 411 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 159 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 1 हजार 93 रुग्ण आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.