Maval Corona Update: मावळात दिवसभरात 71 पॉझिटिव्ह; चौघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (शनिवारी) पुन्हा कोरोना रुग्णांच्या व मृत्यूंच्या संख्येत वाढ झाली. दिवसभरात 71 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. कोरोनाबाधित चार जणांचा मृत्यू झाला.

तळेगाव दाभाडे येथील 50 वर्षीय, गहुंजे येथील 74 वर्षीय, कान्हे येथील 45 वर्षीय व सुदुंबरे येथील 78 वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे.

तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 4 हजार 908 झाली आहे. आत्तापर्यंत 171 जणांचा मृत्यू झाला आहे. 4 हजार 67 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी 39 जणांना घरी सोडण्यात आले.

शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या 71 जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक 25, लोणावळा येथील 16, तळेगाव दाभाडे ग्रामीण येथील सहा, इंदोरी येथील चार, कुसगाव बुद्रुक, ऊर्से, सोमाटणे, नवलाख उंब्रे, तुंग व शिरगाव येथील प्रत्येकी दोन, वडगाव, कामशेत, माळवाडी, वराळे, गहुंजे, चिखलसे, पुसाणे व करंजगाव येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 4 हजार 908 झाली असून त्यात शहरी भागातील 2 हजार 864 व ग्रामीण भागातील 2 हजार 44 जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक 1 हजार 490 लोणावळा येथे 1 हजार 82 व वडगाव येथे रुग्णसंख्या 292 झाली आहे.

आत्तापपर्यंत 171 जणांचा मृत्यू झाला आहे. 4 हजार 67 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी 39 जणांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात 670 सक्रिय रुग्ण आहेत.

त्यातील 481 लक्षणे असलेले तर 189  लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या 481 जणांमध्ये 385 जणांमध्ये सौम्य तर 91 जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. पाच जण गंभीर आहेत.

सध्या सक्रिय असलेल्या 670 रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.