Maval Corona Update: मावळ तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू; आज एकाही नवीन रुग्णाची नोंद नाही

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (रविवारी, दि. 27) एकाही कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली नाही. तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे चालू आहे. शहरी आणि ग्रामीण भागात एकाही रुग्णाची नोंद झाली नसून सध्या तालुक्यात 28 सक्रिय रुग्ण आहेत.

मावळ तालुक्यात आजवर 7 हजार 881 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यात 4 हजार 441 रुग्ण शहरी भागातील होते. तर ग्रामीण भागातील रुग्ण 3 हजार 440 एवढे होते. शहरी भागातील रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण तळेगाव शहरात आढळले. तळेगाव नगर परिषद क्षेत्रात 2 हजार 340, लोणावळा नगर परिषद क्षेत्रात 1 हजार 572 तर वडगाव नगर पंचायत क्षेत्रात 529 रुग्ण आजवर आढळले आहेत.

आतापर्यंत 223 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 7 हजार 630 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या 28 सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांमध्ये 22 रुग्णांमध्ये लक्षणे दिसत असून 6 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे.

रविवारी 7 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मावळ तालुक्यातील केवळ 5 गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.