Maval : मँचेस्टर युनिव्हर्सिटीत मावळच्या कन्येचा डंका

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील वेहेरगाव या छोट्याशा (Maval)गावामध्ये राहणा-या आर्या जितेंद्र बोत्रे हिने शिक्षण क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. इंग्लंड मधील मँचेस्टर युनिव्हर्सिटी या नामांकित विद्यापीठातून मास्टर्स ॲाफ सायन्स बायोटेक्नॉलॉजी ॲन्ड इंटरपायजेस हा अभ्यासक्रम आर्या हिने पूर्ण केला.

शिवाय ती मेरिट लिस्ट मध्ये आली. तिचा पदवीधर समारंभ इंग्लंड येथील मँचेस्टर युनिव्हर्सिटी मध्ये अत्यंत थाटामाटा मध्ये संपन्न झाला. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे.

तिने शालेय शिक्षण लोणावळा येथील रायगड इंटरनॅशनल(Maval ) या शाळेमधून पूर्ण केले शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व इतर कार्यक्रमांमध्ये ती सहभागी होत असत. शाळेच्या जडणघडणीमध्ये ती अग्रभागी असत. शाळेमध्ये ती विद्यार्थ्यांमधून मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून शालेय कॅप्टन म्हणून तिची निवड करण्यात आली होती. विद्यार्थ्यांकरिता तिने खूप चांगलं कार्य केले. शालेय गॅदरिंग मध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावरती एक नाट्य प्रयोग करण्यात आला होता. त्यावेळी तिने जिजाऊची भूमिका खूप सुंदर पद्धतीने साकार केल्याचे लोणावळ्याकरांनी बघितले आहे.

Pune : पुण्यात दोन ठिकाणी आगीच्या घटना

पुढील शिक्षण तिने पुणे येथील वाडिया कॉलेजमध्ये चांगल्या गुणांनी पूर्ण केल्यानंतर युके येथील अनेक युनिव्हर्सिटी मध्ये तिने प्रवेशासाठी एप्लीकेशन केले होते. अभिमानाची गोष्ट म्हणजे तिने सात कॉलेजची निवड केली होती सातही कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळाला होता नामांकित मँचेस्टर युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेण्याचा तिने निर्णय केला.

अभ्यासामध्ये तिने स्वतःला झोकुन घेऊन खूप मेहनत करून तिने ही डिग्री मेरीट लिस्ट मधुन संपादन केल्याचे आई-वडिल नातेवाईक व आपल्या मावळ तालुक्यातील सर्व लोकांमध्ये अभिमान व आनंद निर्माण झाला आहे. मेरिट लिस्ट मध्ये आल्याने इंग्लंड मध्ये अनेक नोकरीच्या संधी आल्या आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.