Maharashtra : बोगस शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाईचा बडगा, राज्यात 661 अनधिकृत

एमपीसी न्यूज – राज्यातील अनधिकृत शाळा, बोगस शाळांचा (Maharashtra)सुळसुळाट रोखण्यासाठी शिक्षण विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. राज्यात 661 शाळा अनधिकृतरित्या सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.

राज्यातील 2012 पूर्वी अनेक शाळा, संस्थांकडून स्वयंअर्थसहाय्यित शाळा अधिनियम 2012 मधील तरतुदींमध्ये शिथिलता देऊन शाळा नियमित करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Pimpri : स्मार्ट सिटीतील स्वच्छतागृहे ‘अस्वच्छ’!

अनधिकृत शाळांबाबतच्या कामातील अनियमिततेबाबत विभागीय शिक्षण (Maharashtra)उपसंचालकांना कारणे दाखवा नोटिस, तर शिक्षणाधिकाऱ्यांना नोटिस बाजवण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्र्यांनी दिली.विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आमदारांनी अनधिकृत शाळांवरील कारवाई बाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली. अनधिकृत शाळा बंद करून फौजदारी कारवाई, गुन्हे दाखल करणे, दंड आकारण्याचे निर्देश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. राज्यात अनधिकृत 661 शाळांपैकी 78 शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

बंद केलेल्या शाळांतील 6 हजार 308 विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात आले. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 186 अनधिकृत शाळांपैकी 14 शाळा बंद करण्यात आल्या. तर उर्वरित 172 शाळांची तपासणी सुरू आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.