Maval : श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे आषाढी एकादशीनिमित्त फुलांची सजावट

एमपीसी न्यूज – आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील(Maval) जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. ही सेवा मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माजी उपसरपंच दिलीप ढोरे यांचे स्नेही किरण आहेर, कुणाल काळूराम कलाटे यांनी दिली. त्यांच्या हस्ते मंदिरात आषाढी एकादशी निमित्त महाभिषेक देखील करण्यात आला.

 

यावेळी रवी गलांडे, बाजीराव चांदेरे, सुरेश सातकर, संतोष मेदनकर, संदीप पवार, संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, विश्वस्त रामभाऊ कराळे पाटील, शांताराम कराळे पाटील, भाऊसाहेब कराळे आदी उपस्थित होते.

Pimpri : सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात पार पडली द ग्रेट मावळा घाटी अल्ट्रा ट्रेल रन स्पर्धा

सजावटीचे यंदा चौथे वर्ष होते. श्री तुकाराम महाराजांनी त्यांच्यांकडून ही सेवा करून घेतली अशा भावना संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी व्यक्त केल्या. आषाढी एकादशी निमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

सर्वांना महाप्रसाद (फराळ) वाटप करण्यात आला. भंडारा डोंगर संस्थानचे सचिव जोपाशेट पवार यांनी (Maval) आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.