Maval : निवडणूक डोळ्यापुढे ठेवून मी काम करत नाही – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – मी गेली अनेक वर्षे काम करत आहे. निवडणूक (Maval) डोळ्यापुढे ठेवून मी कधीही काम केलेले नाही. जनमानसात जाऊन, सर्वसामान्यांची कामे सोडविण्याचे काम करतो. अधिक वेळ जनतेसाठी देतो. माझ्यासमोर कोण उमेदवार हे पाहून मी निवडणूक लढलो नाही. येणाऱ्या निवडणुकीत विरोधी पक्ष कोणतरी उमेदवार देणार आहे. मी मावळ लोकसभा मतदारसंघात 2024 ला सामोरे जाणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

मावळमधून आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार किंवा आमदार आदिती तटकरे या दोघांपैकी एकजण निवडणूक लढवू शकतो अशी चर्चा आहे. या दोघांपैकी कोण उमेदवार समोर असल्यावर निवडणूक सोपी जाईल असे विचारले असता येणाऱ्या निवडणुकीत विरोधी पक्ष कोणतरी उमेदवार देणार आहे. निवडणुकीला अणखी खूप कालावधी आहे असे सांगत खासदार बारणे यांनी अधिक भाष्य करणे टाळले.

Mp shrirang Barne : उगमस्थानापासूनच पवना, इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखा

प्रत्येक पक्षाला संघटना वाढविण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. भाजपने (Maval) यापूर्वीही लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पक्ष बांधणीचे काम केले आहे. संघटना वाढविण्यासाठी समनव्यक नेमले असतील. 2014, 2019 मध्ये भाजपने मला मोठी मदत केली. भाजप शिवसेना एकत्रित लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.