Maval journalists News : ‘कोरोना योद्धा पत्रकारांना विमा संरक्षण मिळावे’

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेची मागणी

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात कोविड-19  या संसर्गाने थैमान घातले आहे. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 1854 वर पोहचली आहे. अशा परिस्थितीत जीवाची पर्वा न करता सर्व स्तरावरील बातम्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांना विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत संघाच्यावतीने मावळच्या तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे. पत्रकारिता ही भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तरी सुद्धा पत्रकारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

त्यामुळे कोविड 19  च्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या पत्रकार बंधूंना मोफत विमा संरक्षण प्राप्त करून द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ ही संघटना पत्रकार व संपादक यांच्या अन्यायाविरुद्ध काम करते, अशी माहिती संघाचे मावळ तालुका अध्यक्ष तुषार वहिले यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.