Maval News: इंगळूनच्या सरपंच, उपसरपंचांसह सदस्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज – मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत इंगळून ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच सुनीताताई सुदाम सुपे, उपसरपंच अरुणाताई ठाकर, ग्रामपंचायत सदस्य बबन चतुर, कांताराम तळपे यांच्यासह शशिकांत मदगे, सुदाम सुपे, बाळू सुपे, भिकाजी सुपे, किसन भागित यांनी काल (सोमवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

आमदार शेळके यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी संजय गांधी समिती अध्यक्ष नारायण ठाकर, युवक अध्यक्ष कैलास गायकवाड, ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष मारुती करवंदे, नारायण मालपोटे, विकास ठाकर, प्रशांत काठे, नारायण थरकुडे, बंडू काठे, सचिन मदगे, आदेश चतुर, अशोक करवंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.