Maval News : मावळमधील ग्रामपंचायत निवडणुका शिवसेना पूर्ण ताकदीने लढणार -श्रीरंग बारणे

स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी झाल्यास निवडणूक जिंकणे सोपे होईल

एमपीसीन्यूज : मावळमध्ये 20 ते 22 ग्रामपंचायतीच्या निवडणूक शिवसेना पूर्ण ताकदीने लढणार आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी आपापल्या सोयीनुसार किंवा सामंजस्याने महाविकास आघाडी केल्यास या निवडणुका जिंकणे आणखी सोपे होईल. त्यादृष्टीने पदाधिकारी आणि कार्यर्त्यांनी निवडणुकांच्या तयारीला लागावे, अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केल्या.

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका शिवसेनेची महत्वाची बैठक वडगाव येथील द्वारकाधिश मंगल कार्यालयात पार पडली. त्यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

शिवसेना जिल्हा संपर्क प्रमूख बाळा कदम, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, युवा सेना विस्तारक राजेश पळसकर,  उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे व तालुका प्रमुख राजेश खांडभोर, युवा सेना तालुका अधिकारी अनिकेत घुले, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका शाधान चौधरी, तालुका संघटिका शैला खंडागळे, नगरसेविका सिंधू परदेशी, कल्पना आखाडे व संघटक सुरेश गायकवाड, उपतालुका प्रमुख चंद्रकांत भोते, तालुका समन्वयक रमेश जाधव, अमित कुंभार, आशिष ठोंबरे, तळेगाव शहर प्रमुख दत्ता भेगडे, महिला आघाडीच्या अनिता गोणते, शिवसेना देहूरोड शहरप्रमुख भरत नायडू, सतीश इंगवले, सिधू नलावडे, एकनाथ जांभूळकर, उमेश गावडे, रमेश नगरकर, सोमनाथ कोंडे, काळू हुलावळे, अशोक निकम, रामभाऊ सावंत, सुनील शिंदे, जयदास ठाकर, उमेश दहीभाते, किसन तरस आदी उपस्थित होते.

या निवडणुका भावकी व गावकीच्या असल्याने गाफील न राहता सक्षमपणे या निवडणुकीला ला सामोरे जाणार असल्याचे पुणे जिल्हा संपर्क प्रमूख बाळा कदम यांनी सांगितले.

तर पदाधिकारी यांना निवडणुक काळात पदाधिकाऱ्यांना काहीही अडचण येऊ देणार नसून जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर भगवा फडकावण्यासाठी प्रयत्नशील राहण्याच्या सूचना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी दिल्या.

बैठकीत तळेगाव दाभाडे येथील अनेक महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना तळेगाव शहर कार्यकारिणीच्या विविध जबाबदाऱ्या सोपवून खासदार बारणे आणि जिल्हा संपर्कप्रमुख कदम यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे व तालुका प्रमुख राजेश खांडभोर यांच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

प्रास्ताविक राजेश खांडभोर यांनी केले. सूत्रसंचालन मदन शेडगे यांनी केले. तर आभार युवा सेना तालुका अधिकारी अनिकेत घुले यांनी मानले.

देहूरोड शहर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

शिवसेना देहूरोड समन्वयकपदी अरूण गोंन्टे, सल्लागारपदी देवा कांबळे, विलास हिनुकले, सुरेश मुळे, विभागप्रमुखपदी विजय थोरी, शशिकांत सप्पागुरू, गणेश सावंत, शाखाप्रमुखपदी संतोष बालघरे, उपशाखा प्रमुखपदी नारायण जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.