Maval : पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी महिनाभरात सुधारित अहवाल सादर करा – अनिल पाटील

एमपीसी न्यूज – मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या (Maval) पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी महिनाभरात सुधारित अहवाल सादर करण्याचे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहेत. मावळ तालुक्यातील पवना, आंद्रा, जाधववाडी,भूशी धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात बुधवारी (दि.23) बैठक झाली.

याबैठकीत मंत्री अनिल पाटील यांनी पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा सविस्तर आढावा घेतला. पुनर्वसनाबाबत जलसंपदा व महसूल विभागाने केलेल्या जमिन वाटप अहवालात त्रुटी असल्याने यासंदर्भात दोन्ही विभागाचे संबंधित अधिकारी यांनी संयुक्त बैठक घेऊन वाटप क्षेत्र निश्चित करावे.

आणि महिन्याभरात सर्व तांत्रिक त्रुटी दूर करुन अहवाल सादर करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत.

पवना प्रकल्पग्रस्तांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत आहे.जोपर्यंत पुर्नवसनाचा प्रश्न सुटत नाही.तोपर्यंत आमचा पाठपुरावा सुरुच राहील.
– आमदार सुनिल शेळके.

पुनर्वसनाची ही शेवटची मिटिंग- Maval

पवना पुनर्वसनाच्या बाबतीत गेली चार वर्षांपासून आमदार सुनिल शेळके यांच्यासह सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.अनेक बैठका झाल्या परंतु अंतिम निर्णय अजून झालेला नाही.

प्रशासनाने महिनाभरात निर्णय न केल्यास होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे.असा इशारा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत दिला आहे.

याबैठकीस अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे, तहसीलदार विक्रम देशमुख, उपअभियंता अशोक शेटे, पवना धरणग्रस्त संयुक्त समिती अध्यक्ष नारायण बोडके,बाळासाहेब मोहोळ,रविकांत रसाळ,मुकुंद काऊर, बाळासाहेब काळे, रवि ठाकर,किसन घरदाळे, मारुती दळवी, दत्तात्रय ठाकर,दत्तात्रय घरदाळे,अंकुश आंबेकर,नारायण ठाकर,दशरथ शिर्के,संतोष कडू,अरविंद रोकडे आदि उपस्थित होते.

Talegaon Dabhade : वर्धापन दिनानिमित्त ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.