BNR-HDR-TOP-Mobile

Maval/Takave : मावळवासीयांच्या आयुष्यातील अंधार घालविण्यासाठी एक संधी द्या – सुनील शेळके

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील लोकांच्या आयुष्यात गेल्या 25 वर्षात पडलेला अंधार घालवण्यासाठी मतदारांनी आपल्याला एक संधी द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी केले.

आंदर मावळात सुनील शेळके यांनी काल (बुधवारी) बोरीवली, कांब्रे, डाहुली, बेंद्रेवाडी, कांडी, निळशी, मेठलवाडी, सावळा, तळपेवाडी व पिंपरी या गावांमध्ये प्रचारदौरा काढून मतदारांशी संवाद साधला. प्रत्येक गावात सुनीलआण्णा यांचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले. ढोल-ताशांच्या दणदणाटात मिरवणूक काढून, सुवासिनींनी औक्षण करून सुनीलआण्णांना शुभेच्छा दिल्या.

शेळके म्हणाले की, अंधार मावळमधील प्रत्येक गावात आपल्याला वाजत-गाजत, उचलून आणले आहे. हा सुनील शेळके तुम्हांलाही डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. मावळच्या जनतेच्या आयुष्यात गेल्या 25 वर्षांत अंधार पसरला आहे. हा अंधार दूर करून विकासाची उजेड आणण्यासाठी आपल्याला एक संधी द्यावी.

धरण उशाला कोरड घशाला या म्हणण्याप्रमाणे योग्य नियोजन नसल्यामुळे धरण जवळ असूनही कुसूर गावात प्यायला पाणी नसल्याबद्दल शेळके यांनी खंत व्यक्त केली.

बोरवलीमध्ये 40 वर्षांपासून असलेला पाण्याचा प्रश्न अण्णांमुळे सुटला, असे ग्रामस्थांनी सांगितले. संपूर्ण तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्याची धमक फक्त सुनीलआण्णांमध्येच आहे, असा विश्वास यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला.

बोरवली येथे सरपंच प्रतिभा शेलार, नाथा शेलार, नामदेव शेलार यांनी, कांंब्रे येथे सुदाम आलम, बबन आलम,अशोक आलम, सुनील आलम, मदन आलम, प्रकाश देशमुख यांनी, डाहुली येथे गोपाळ पिंगळे, बबन पिंगळे, गबाजी पिंगळे, भीमराव पिंगळे, ज्ञानेश्वर सावंत, सीताबाई सावंत, संगीता पिंगळे, सुजाता पिंगळे सुरेश पिंगळे यांनी, बेंद्रेवाडी येथे माजी सरपंच नाथा पिंगळे, बबन पिंगळे, लहू पिंगळे, पोपट पिंगळे यांनी, खांडी येथे सरपंच विमल निसाळ, बाळू पावशे, लहू पावशे पाटील, माऊली नगरकर, रघू तळपे, वसंत देशमुख, रमेश नगरकर, रवींद्र जानकर, सीताराम सावंत यांनी, निळशी येथे शिवाजी म्हसे, दत्ता म्हसे, अनिता गुडे, रोहिदास आंबेकर, बाळू भोईर, नारायण तनपुरे, रामदास गुडे, शशिकांत तनपुरे, खंडू गुडे यांनी, मेठलवाडी येथे अमोल क्षीरसागर, विजय क्षीरसागर, भरत भोईर घोईरट, विठ्ठल घोईरट, राजू क्षीरसागर यांनी, सावळा येथे बाळू ठाकर, लक्ष्मण शिंदे, दामू भोईर (पाटील), हनुमंत नाईकडे, अर्जुन भोईर, रामदास भोईर, जालिंदर भोईर यांनी तर तळपेवाडी येथे प्रमोद काठे, अविनाश काठे, संदीप काठे,गंगा काठे, सुरेश काठे, अशोक सुपे, नाथा मोरमारे, अंकुश काठे यांनी शेळके यांचे स्वागत केले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like