-MPC-TOP-MOST-BANNER-I

Maval : रवींद्र भेगडे यांच्या भाजप उमेदवारीच्या आशा पल्लवीत!

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभा मतदार संघात उमेदवारीवरून सुरू असलेल्या चुरशीमुळे भाजपाच्या पहिल्या यादीत मावळची उमेदवारी जाहीर झालेली नाही. मावळच्या उमेदवारीवरून पक्ष पातळीवर मोठ्या हालचाली सुरु असून मावळ तालुक्यातील ‘मिस्टर क्लिन’ चेहरा म्हणून पक्ष वाढीसाठी तळमळीने काम करणारे मावळ प्रबोधनीचे संस्थापक रवींद्र भेगडे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

मागील आठवड्यात भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी रवींद्र भेगडे यांच्या घरचा पाहुणचार घेतला होता. दोन दिवसांपूर्वी माजी आमदार दिगंबर भेगडे व इतर ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रवींद्र भेगडे यांच्या उमेदवारीकरिता घातलेली गळ या सर्व घडामोडींमुळे मावळच्या उमेदवारीचा सस्पेंन्स वाढला असून येत्या काही तासांत रवींद्र भेगडे यांचे नाव जाहीर होईल, असा आशावाद त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.

रवींद्र भेगडे हे संयमी स्वभावाचे असून त्यांची स्वच्छ प्रतिमा व मावळ प्रबोधनीच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील जनतेकरिता राबविलेले उपक्रम ही त्यांची जमेची बाजू आहे. मागील पंधरा वर्षे पद असो वा नसो पक्षवाढीकरिता त्यांनी दिलेले योगदान व माजी आमदार दिगंबर भेगडे यांनी दहा वर्ष या तालुक्याचे नेतृत्व करताना केलेली विकासकामे, या सर्व बाबींचा विचार करुनच उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn