Maval : कोल्हापूर येथील पर्यटक टाटा धरणात बुडाला; अद्याप बेपत्ता

एमपीसी न्यूज – कोल्हापूर येथील पर्यटक (Maval) मावळ तालुक्यातील टाटा धरणात  बुडाल्याची घटना बुधवारी घडली. अंदर मावळमधील टाटा धरणात हा तरुण पोहायला गेला असता धरणात बुडाला. अद्याप तो सापडला नसून अरुण धनंजय माने (वय 25, रा. कोल्हापूर) असे या तरुणाचे नाव आहे.  

अरुण माने हा कोल्हापूर येथून मावळ तालुक्यात पर्यटनासाठी आला होता. बुधवारी दुपारी तो अंदर मावळ वडेश्वर शिंदे घाटेवाडी येथे पर्यटन करत असताना टाटा धरणात पोहायला गेला. धरणात पोहत असताना अरुण माने अचानक गाळात अडकला. स्थानिक नागरिक आणि त्यांच्या साथीदारांनी त्याचा शोध घेतला असता अरुण सापडला नाही.

त्याचा शोध घेण्यासाठी आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ या संस्थांच्या स्वयंसेवकांना शोध कार्यासाठी प्रचारण करण्यात आले. अद्यापही त्याचे शोध कार्य सुरू आहे.

Today’s Horoscope 06 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.