MHADA : ‘म्हाडा’ ने घरांच्या उपलब्धतेसाठी प्रकल्पांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री

पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या 3120 सदनिकांची सोडत

एमपीसी न्यूज : प्रत्येकाला घर उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे.(MHADA) त्यानुसार म्हाडाने घरांची उपलब्धता करून देण्यासाठी प्रकल्पांना गती द्यावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

पुणे मंडळातर्फे म्हाडा गृहनिर्माण योजना, 20 टक्के सर्वसमावेशक योजना व प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण योजनेतील 3 हजार 120 सदनिकांच्या ऑनलाईन सोडतीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, पुणे मंडळाचे मुख्याधिकारी नितीन माने – पाटील, ओव्हरसाइट समिती अध्यक्ष एम. एम. पोतदार, उपायुक्त दीपक नलावडे,  समिती सदस्य  धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.

 

Pune Crime : सासरच्या त्रासाला कंटाळून नवविवाहित महिलेची आत्महत्या

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की अन्न, वस्त्र याबरोबरच निवारा आवश्यक आहे. रोजगारासाठी शहरी भागात नागरिक येतात. त्यांना माफक आणि परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देताना किमान सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी म्हाडाने आपल्या प्रकल्पांना गती द्यावी.(MHADA)  तसेच बांधकामाची गुणवत्ता राहील याची दक्षता घ्यावी. अधिकाधिक घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाने नियोजन करीत लवकरात लवकर घरांच्या सोडती काढाव्यात.

 

पुणे मंडळामार्फत काढण्यात येत असलेल्या 6 हजार 58 सदनिकांसाठी 58 हजार 467 अर्जदारांनी अर्जाची अनामत रक्कम भरून सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यातील 2 हजार 938 सदनिका या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आल्या. 3 हजार 120 सदनिकांसाठी 55 हजार 845 अर्ज प्राप्त झाले.

एकूण सदनिका – 6058

एकूण प्राप्त अर्ज –  58, 467

म्हाडा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना सदनिका-  2,938

20 टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजना – 2,483

प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) – 637

एकूण सदनिका – 3,120

एकूण प्राप्त अर्ज – 55,845

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.