BNR-HDR-TOP-Mobile

Maval : नाणे मावळमध्ये राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे जोरदार स्वागत

एमपीसी न्यूज – राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे मावळातील नागरिकांनी जोरदार स्वागत केले. भाजपला आणि मोदींना मानणारा फार मोठा वर्ग या भागात असल्याने रस्त्यावरून जात असताना गावातील सर्वसामान्य माणूसही त्यांच्या स्वागतासाठी आतूर झाला होता. अनेक ठिकाणी त्यांच्या सत्काराचे सभेत रूपांतर झाल्याचे यावेळी पाहायला मिळत होते. बाळा भेगडे यांच्या नियोजीत दौ-यात गावाचा उल्लेख नसतानाही अनेक ठिकाणी सत्काराचे रूपांतर जाहीर सभेत कधी झाले ते कळलेच नाही.

प्रत्येक गावामध्ये स्वागतासाठी बहुसंख्येने लोक उपस्थित होते. या गावात भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. शासनाच्या कल्याणकारी योजना जन सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी, असे त्या यावेळी म्हणाले.

पाथरगाव, पिंपोळी, ताजे, बोरज, पाटण, भाजे, मळवली, देवले, औंढोली, औंढे, आदी ठिकाणी रस्त्यावर वाहनाचा ताफा थांबवून गावक-यांनी त्यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत व ढोल ताशांच्या निनादात जोरदार स्वागत केले. अनेक ठिकाणी तर केवळ सत्कार करायचा म्हणून गावक-यांनी थांबवले आणि त्यांना दोन शब्द बोलायलाच लावले. त्यामुळे सत्काराचे रूपांतर जाहीर सभेत कधी झाले ते कळलेच नाही. लोकांचे अभूतपूर्व प्रेम पाहून आज बाळा भेगडे भारावून गेले होते.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like