Pune : रेसकोर्सच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 17 ऑक्टोबरला सभा

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात जाहीर सभा होणार आहे. रेसकोर्सच्या मैदानावर दि. 17 ऑक्टोबरला या सभेचे आयोजन करणयात येणार असल्याची माहिती समजते.

_MPC_DIR_MPU_II

2014 च्या निवडणुकीत भाजपने शहरातील आठही मतदारसंघात कमळ फुलवले होते. मात्र, आता तशी परिस्थिती नाही. त्यावेळी सर्वच पक्ष स्वतंत्र लढले होते. त्याचा भाजपला फायदा झाला. या निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादीची आघाडी तर, शिवसेना भाजपची युती आहे. पण, शिवसेनेला एकही जागा सोडण्यात आली नाही. त्यामुळे शिवसैनिक दुखावले आहेत. शिवाय मनसेनेही उमेदवार उभे केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात जाहीर सभा व्हावी, यासाठी शहर भाजपने पक्षाकडे मागणी केली होती. मोदी यांच्या सभेमुळे शहर आणि जिल्ह्यातील वातावरण भाजपमय होणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. या जाहीर सभेसाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, जिल्ह्यातून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.