Chirohali News : स्कूल बस चालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – स्कूल बसमधील अल्पवयीन मुलीला (Charholi News) आडबाजूला घेवून जात चालकाने विनयभंग केला. ही घटना च-होली येथे सोमवारी दुपारी सव्वा एकच्या दरम्यान  घडली.

याप्रकरणी स्कूल बसचालक प्रशांत सखाराम आंत्रे (वय 34, रा.च-होली फाटा) याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत मुलीच्या आजीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Chakan News : पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत हा खेड येथील रिव्हर डेल स्कूलमधील बसवर चालक आहे. आरोपी प्रशांत याने सोमवारी दुपारी च-हो ली येथे स्कुल बस थांबविली.(Charholi News) फिर्यादी यांच्या नातीला एकटीलाच बसमधून खाली उतरवले. तिला चालत आडबाजूला खड्यात घेवून जात तिचा विनयभंग केला. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.