Pimpri news: आंद्रा-भामा आसखेड प्रकल्पाच्या कामाचा आमदार महेश लांडगे यांनी घेतला आढावा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील पाणी पुरवठा सक्षम करण्याच्या दृष्टीने ‘संजीवनी’ असलेल्या आंद्रा भामा आसखेडसह विविध प्रकल्पांचा आमदार महेश लांडगे यांनी जागेवर जाऊन आढावा घेतला. शहराची भविष्यातील वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता पाणीपुरवठा योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

सुदवाडी (ता. मावळ)येथील सुरू असलेले पाईलपलाईनचे काम, तळवडे येथील जॅकवेलची जागा, चिखली येथील पाईपलाईन आणि 100 एमएलडी डब्ल्यूटीपी प्रकल्पाची पाहणी  केली.

स्थायी समिती सभापती ऍड. नितील लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, नितीन काळजे, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष लोंढे, पाणी पुरवठा विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण लडकत, कार्यकारी अभियंता झुंदारे आदी उपस्थित होते.

तळवडे येथील जागेची ताबा न मिळाल्याने जॅकवेलचे काम खोळंबले होते. मात्र ही जागा ताब्यात मिळाली आहे. त्याठिकाणी जॅकवेलचे काम पुन्हा प्रगतीपथावर सुरू आहे. सात किलोमीटरच्या पाईपलाईनच्या कामासह चिखली येथील पाईपलाईन, चिखली येथील 100 एमएलडी च्या डब्ल्यूटीपीचे कामही सुरू आहे. नागरिकांना ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत कामे पुर्ण करून डिसेंबर अखेर पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.

तळवडे येथील जॅकवेलच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. सिंटेल या कंपनीची जागा महापालिकेला हस्तांतरीत करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे जॅकवेलच्या कामाला गती मिळाली आहे. या जागेची पाहणी आमदार लांडगे आणि अधिकाऱ्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.