Vadgaon Maval : जागतिक डॉक्टर्स दिनानिमित्त मनसेतर्फे डॉक्टरांचा सन्मान

एमपीसी न्यूज – जागतिक डॉक्टर्स दिनानिमित्त वडगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील सर्व डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. जागतिक डॉक्टर्स दिवस (1 जुलै) साजरा करण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

 

 

मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शहरातील सर्व डॉक्टर्स यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार करून व शुभेच्छा देत जागतिक डॉक्टर्स दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.

 

Sanjay Raut : पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांची ईडीकडून 10 तास चौकशी

 

” कोरोनासारख्या अभूतपूर्व महामारीच्या काळात तसेच दैनंदिन जीवनात इतर आजारांवर रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या कार्याला मनसेतर्फे सलाम व सदैव रुग्णांना सेवा देणाऱ्या या डॉक्टरांच्या कार्याची दखल मनसे नेहमी घेत राहील.” असे मत यावेळी ओंकार भांगरे यांनी व्यक्त केले.

 

 

यावेळी वडगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ओंकार भांगरे, अजय देडे, शुभम म्हाळसकर, पौरस डुकरे, दामोदर बनकर, दिनेश म्हाळसकर,रोहित कोळी, ओमकार चिमटे, आदित्य म्हाळसकर, प्रणव म्हाळसकर, संतोष छेत्री, श्रेयस दरेकर व अन्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.