Pune Crime : परदेशात मोबाईल विकणारी टोळी जेरबंद, 19.50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज : मोबाईल दुकान फोडून ते मोबाईल परदेशात विकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आळेफाटा पोलिसांना यश मिळाले आहे. (Pune Crime) येथील त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स या इमारतीत असलेल्या कोहिनूर मोबाईल शॉपी या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी रेडमी, टेक्नो, ईनफिन्सिक सॅमसंग आदी कंपनींचे 13 लाख 13 हजार 890 रुपये किमतीचे 140 मोबाईल व 1 डीव्हीआर मशिन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. या संदर्भातील गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी ईश्वरलाल इरागर, वय 32 वर्षे, सध्या रा. विरार, जि. पालघर, मूळ. रा. राजस्थान, महावीर कुमावत वय 35 वर्षे सध्या रा. विरार, जि. पालघर, मूळ. रा. राजस्थान, उवेश कपाडिया, वय 32 वर्षे, रा. चौक बाजार, सिंधीवाड, सुरत, राज्य गुजरात या आरोपींना अटक करण्यात आले आहे.

आरोपी कपाडिया याने हे चोरीस गेलेले मोबाईल दक्षिण आफ्रिका, नेपाळ, बांगलादेश या देशांमध्ये ममू नावाच्या व्यक्तीला भेंडीबाजार (मुंबई) येथे विकले. या गुन्ह्यात चोरीचे मोबाईल विकून मिळविलेले 12 लाख रुपये, मोबाईल दुकानातून चोरलेले 2 लाख 50 हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली 5 लाख रुपये किमतीची गाडी असा एकूण 19 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

Alandi News : महिलेचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले

या गुन्ह्यामध्ये  महागडे मोबाईल फोन तसेच रोख रक्कम चोरीला गेल्याने आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर यांनी पोलीस ठाण्याकडील स्टाफचे पथके बनवून त्यांना हा गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने सूचना केल्या होत्या. त्यानुसार गुन्ह्याची तपासी अधिकारी सहाय्य्क पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर व पथकाने या गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून व गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळवून त्यानुसार अज्ञात आरोपीचा माग काढला.

ईश्वरलाल इरागर, वय 38 वर्षे, रा. विरार, जि. पालघर, मूळ. रा. राजस्थान व महावीर कुमावत वय 35 वर्षे सध्या रा. विरार, जि. पालघर, मूळ. रा. राजस्थान यांना विरार येथे जाऊन ताब्यात घेतले.

या आरोपींकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी शाहिद अब्दुल सत्तार कपाडिया तसेच संजय यादव उर्फ म्हात्रे यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. (Pune Crime) तसेच त्यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेली 5 लाख रुपये किंमतीची महिंद्रा कंपनीची पिकप गाडी त्यांच्याकडे मिळून आल्याने ती गुन्ह्याच्या तपासासाठी जप्त करण्यात आली आहे.या वेळी गुन्ह्याच्यावेळी वापरलेली 5 लाख रुपये किमतीची पिकअप गाडी (एमएच 48 एजी 2380) ही गाडी मिळून आली. ती जप्त करून त्यांना 17 डिसेंबर 2022 रोजी अटक केली. न्यायालयात हजर करून न्यायालयाने त्यांना 9 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली होती.

त्यानुसार त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी आरोपी शाहिद कपाडिया याने ते मोबाईल हे त्याच्या भावाला विकले असल्याबाबत सांगितल्याने आळे फाटा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर पोलीस हवालदार विनोद गायकवाड,  पोलीस नाईक पंकज पारखे,(Pune Crime) पोलीस कॉन्स्टेबल अमित माळुंजे यांनी सुरत येथे जाऊन त्या गुन्ह्यात चोरीस गेलेले मोबाईल विकत घेणारा इसम उवेश अब्दुल सत्तार कपाडिया, रा. सुरत, राज्य गुजरात याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली. त्याने या गुन्ह्यातील 24 गेलेले मोबाईल विकत घेतले असल्याचे कबूल केले. त्याने ते मोबाईल दक्षिण आफ्रिका, नेपाळ, बांगलादेश या देशांमध्ये ममु रा. भेंडी बाजार, मुंबई पूर्ण नाव माहित नाही याच्या मार्फत विकून टाकले असल्याबाबत माहिती दिली.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.