Alandi News : महिलेचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज पायी जाणाऱ्या महिलेचे चोरट्यांनी दिड तोळ्याचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून नेले आहे. हा प्रकार शनिवारी (दि.7) सायंकाळी आळंदी (Alandi News) येथे बिडकर वाड्या समोर रोडवर घडला.

याप्रकऱणी 45 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

Pune News : मुलांच्या वाचनाची आवड ओळखून बालसाहित्यनिर्मिती व्हावी : डॉ. मंगला नारळीकर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची मैत्रिण पायी जात असताना आरोपी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून मागून आले व त्यातील एकाने फिर्यादी यांच्या गळ्यातील (Alandi News) 45 हजार रुपयांचे 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावले.यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.