Monsoon League : ट्रोजन्स् क्रिकेट क्लबचा सलग दुसरा विजय; जोशी स्पोर्ट्स संघाचा पहिला विजय !

एमपीसी न्यूज : एजीएएस मॅनेजमेंट तर्फे आयोजित ‘मान्सुन लीग’ (Monsoon League) अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत ट्रोजन्स् क्रिकेट क्लब संघाने स्पर्धेत सलग दुसरा तर, जोशी स्पोर्ट्स संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून स्पर्धेत पहिला विजय नोंदविला.

मुकूंदनगर येथील कटारीया हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत हर्ष टांक याच्या नाबाद शतकी खेळीमुळे ट्रोजन्स् क्रिकेट क्लबने फार्मा इलेव्हन संघाचा 6 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना अभिषेक कौशिष (42 धावा), अभय वसंतराव (32 धावा) आणि अमोल करमपुरी (23 धावा) यांच्या फलंदाजीमुळे फार्मा इलेव्हन संघाने 19.4 षटकामध्ये 176 धावांचे आव्हान उभे केले. या आव्हानाचा पाठलाग करताना ट्रोजन्स् क्रिकेट क्लबने पहिले दोन फलंदाज झटपट गमावले. सलामीवीर हर्ष टांक याने 61 चेंडूत 15 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 100 धावा फटकावल्या. गौरव उपाध्याय (44 धावा) आणि हर्ष यांनी 54 चेंडूत 79 धावांची भागिदारी केली आणि संघाच्या विजयाचा पाया रचला. संघाने हे आव्हान 19.2 षटकात व 4 गडी गमावून पूर्ण केले.

Monsoon League

कुणालसिंग चौहान याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर जोशी स्पोर्ट्स संघाने इलेव्हन स्टॅलियन संघाचा 14 धावांनी पराभव केला. जोशी स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 155 धावा धावफलकावर लावल्या. निलेश माळी (49 धावा) व कुणालसिंग चौहान (44 धावा) या दोघांनी 69 चेंडूत 97 धावा जोडत भक्कम सलामी दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना इलेव्हन स्टॅलियनचा डाव 141 धावांवर मर्यादित राहीला. श्रेयस गैधानी याने 77 धावा करून एकहाती लढा दिला पण संघाचा पराभव (Monsoon League) तो टाळू शकला नाही.

सामन्याचा संक्षिप्त निकाल – गटसाखळी फेरी

फार्मा इलेव्हनः 19.4 षटकात 10 गडी बाद 176 धावा (अभिषेक कौशिष 42, अभय वसंतराव 32, अमोल करमपुरी 23, ए. राजकुमार 3-29, गौरव उपाध्याय 2-24) पराभूत वि. ट्रोजन्स् क्रिकेट क्लबः 19.2 षटकात 4 गडी बाद 179 धावा (हर्ष टांक नाबाद 100 (61, 15 चौकार, 2 षटकार), गौरव उपाध्याय 44, अमोल लहासे 1-25);(भागिदारीः चौथ्या गड्यासाठी हर्ष आणि गौरव यांच्यात 79(54); सामनावीरः हर्ष टांक;

जोशी स्पोर्ट्सः 20 षटकात 9 गडी बाद 155 धावा (निलेश माळी 49(37, 3 चौकार, 3 षटकार), कुणालसिंग चौहान 44, सैफ अलि 4-30, हितेश चंदानी 2-23);(भागिदारीः पहिल्या गड्यासाठी निलेश आणि कुणाल 97 (69) वि.वि. इलेव्हन स्टॅलियनः 20 षटकात 8 गडी बाद 141 धावा (श्रेयस गैधानी 77 (56, 10 चौकार, 2 षटकार), उत्कल स्वेन 24, पुष्कर कुयाते 3-21, कुणाल चौहान 2-15); सामनावीरः कुणालसिंग चौहान.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.