Maharashtra Legislative Council Election : आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप

एमपीसी न्यूज : विधान परिषदेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात असताना राज्यसभेची (Maharashtra Legislative Council Election) परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. काँग्रेसने भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. दुसऱ्यांमार्फत मतदान केल्याने गुप्ततेचा भंग झाल्याच्या संशयावरून हा आक्षेप घेण्यात आला आहे. 

आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक हे दोघेही भयंकर आजारातून जात आहेत. तरीही त्यांनी पुण्याहून मुंबई येथे प्रवास करून लोकशाही आणि पक्ष निष्ठता जपण्यासाठी राज्यसभा आणि विधानपरिषद या दोन्ही निवडणुकीला हजेरी लावली. त्यांना उभे राहता येत नसल्याने त्यांनी आपले मत कागदावर लिहून दुसऱ्या व्यक्तीमार्फत कागद मतदानाच्या पेटीत टाकला. या गोष्टीवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. यामध्ये गुप्ततेचा भंग झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. एखादा व्यक्ती आजारी असेल, तर तो दुसऱ्या व्यक्तीची मदत घेऊन मतदान करू शकतो. परंतु, हे मतदान करताना नियमांचा भंग झाल्याचे काँग्रेसने म्हंटले आहे.

Maharashtra Legislative Council Election : फक्त चार आमदारांचे मतदान बाकी!

यावर उत्तर देताना भाजप नेते सुधीर मुनगटीवार म्हणाले, की ”विनाश काले विपरीत बुद्धी. कॉँग्रेसला आपला पराभव दिसत असल्याने काँग्रेस अशी वागत आहे.” लोकशाहीचे कर्तव्य पार पाडणाऱ्या लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना मी सलाम करतो असे मुनगटीवार म्हणाले. या आक्षेपावर रिटर्निंग ऑफिसर खुलासा करतील, त्यावेळी सत्य बाहेर येईल. जे मतदान झालेले आहे, ते रिटर्निंग ऑफिसरच्या सूचनेनुसार झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.