Maharashtra Legislative Council Election : फक्त चार आमदारांचे मतदान बाकी!

एमपीसी न्यूज : आज राज्यात विधान परिषदेचा (Maharashtra Legislative Council Election) धुराळा पाहायला मिळत आहे. आता केवळ चार आमदारांचे मतदान बाकी आहे. तर 281 आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे. चार वाजेपर्यंत मतदान संपणार असून पुढे निकालाला प्रारंभ होणार आहे. 

Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या दहाव्या जागेसाठी अटीतटीची लढत; भाई जगताप की प्रसाद लाड होणार विजयी?

आज विधान परिषदेची मतदान प्रक्रिया सुरू आहे. भाजप 5 विरुद्ध महाविकास आघाडी 6 अशी ही लढत आहे. पुन्हा देवेंद्र फडणवीस गेम करणार का महाविकास आघाडी हा गेम आधीच पाडणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. मतदान संपायला केवळ एकच तास उरला आहे. अजूनही चार आमदारांचे (Maharashtra Legislative Council Election) मतदान बाकी आहे. 5 नंतर आजचा निकाल समजणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.