Ransom Case : खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक; निगडी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – खंडणी (Ransom Case) मागितल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. ८ लाख रुपये आणि मासिक 50 हजार रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

आशिष पालकर (वय 39 वर्षे, रा. रविवार पेठ) आणि योगेश वाडेकर (वय 42 वर्षे, रा. शुक्रवार पेठ) अशी अटक झालेल्या दोघांची नावे आहेत.  लाजपतराय मित्तल (वय 57 वर्षे, रा. चिंचवड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष पालकर याने फिर्यादीस फोन करून प्लॉट नो 109, सुबोध शाळेजवळ, संभाजीनगर, चिंचवड येथे बोलावून घेतले. त्यावेळी फिर्यादी यांच्याकडे असलेला सरकारमान्य धान्याचा साठा तुमचा नाही, तुम्ही तो चोरी करून आणलेला आहे.  जर तात्काळ 8 लाख रुपये व दर महिन्याला 50 हजार रुपये प्रमाणे दिले नाहीत तर त्यांच्यावर खोटी पोलीस केस करणार अशी धमकी दिली.

दरम्यान, दोन्ही आरोपींनी फिर्यादी यांच्या गोडाऊनचे फोटो काढून फिर्यादी यांस पोलीस केस करण्याची धमकी दिली आणि फिर्यादीकडे तात्काळ 8 लाख रुपये व दर महिन्यला 50 हजार रुपये प्रमाणे खंडणीची (Ransom Case) मागणी केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून आणखी तपास करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.