Kidnapping Case : 8 वर्षीय मुलीच्या अपहरण प्रकरणी ज्येष्ठ नागरिक अटकेत

एमपीसी न्यूज – आठ वर्षीय मुलीच्या अपहरण प्रकरणी (Kidnapping Case) आरोपीला पकडण्यात चिंचवड पोलिसांना यश आले असून यामध्ये 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला अटक करण्यात आली आहे. 

सर्जेराव बनसोडे (वय 62 वर्षे, रा. मु. पो. ढवळ, तालुका माढा, जिल्हा सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली होती.

Sangli Suicide : खळबळजनक! सांगलीत एकाच कुटुंबातील 9 जणांची सामुहिक आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बनसोडे यांनी आठ वर्षांच्या मुलीला पत्राशेड, चिंचवड येथून आमिष दाखवून पळवून (Kidnapping Case) नेले. सदर घटना 19 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 च्या सुमारास घडली आहे.

T20 WC : इरफान पठाणने टी 20 वर्ल्डकपसाठी प्लेईंग 11 निवडली, पंतला वगळले

दरम्यान, या प्रकरणी आरोपीविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात कलम 363 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पकडण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.