Moshi : पूर्वी झालेल्या वादामधून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या शाब्दिक वादाचा राग मनात धरून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार केला. तसेच इतर दोघांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. 17) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मोशी येथे घडली.

सौरभ संजय गांजाळे (वय 18, रा. शिवाजीवाडी, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गणेश नांगरे (रा. घरकुल, चिखली), बाबू खंदारे (रा. कोंढवा, पुणे) आणि माया पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौरभ आणि त्यांचे मित्र नागेश पठारे, आदेश टिळेकर हे इंद्रायणी नदीजवळ गार्डनमध्ये गप्पा मारत होते. त्यावेळी तेथे आलेल्या आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्यांना शिवीगाळ करीत लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच आरोपींनी सौरभ यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. यामध्ये सौरभ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.