Moshi : दोन महिन्यांनी उलगडले तरूणाच्या मृत्यूचे गुढ, तीन मित्रांना केले अटक

एमपीसी न्यूज – दोन महिन्यांपूर्वी मोशी (Moshi) येथे पाचव्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाला. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचा संशय पोलिसांना आला. परंतु, दोन महिन्याच्या तपासात ही आत्महत्या नसून त्याला उडी मारण्यास त्याच्याच मित्रांनी प्रवृत्त केल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. हा प्रकार 21 मे 2023 रोजी मोशी येथील तुपे वस्ती येथे घडला होता.

या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या सागर दत्तात्रय गाढवे (वय 29, रा.चिखली), सुहास गयाभाऊ गाढवे (वय 23, रा. चिखली) व मंगेश जालींदर वाळुंज (वय 26, रा. चिखली) यांना अटक केली आहे. मिथिलेश लंगोटे असे मयत तरुणाचे नाव आहे.

Gurupaurnima : गुरु हे एक तत्व आहे; या तत्वाचे पूजन होणे आवश्यक आहे!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथिलेश हा तुपे वस्ती येथील कॉसमॉस सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याची अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, काही संशयात्मक बाबींचा तपास करत असताना पोलिसांसमोर धक्कादायक सत्य समोर आले.

ज्यामध्ये मिथिलेश हा आरोपींसोबत कॉसमॉस सोसायटीच्या (Moshi) फ्लॅटमध्ये दारू पीत बसला होता. यावेळी त्यांच्यात भांडण झाले व भांडणाचे रुपांतर मारामारीत झाले. यावेळी मारामारीपासून वाचण्यासाठी मिथिलेश तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.

मात्र, आरोपींनी त्याला जाऊ दिले नाही. यावेळी मिथिलेश फ्लॅटच्या गॅलरीत गेला व तेथून त्याने शेजारच्या फ्लॅटच्या गॅलरीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. यात तो थेट पाचव्या मजल्यावरून खाली पडला व त्याचा मृत्यू झाला.

या साऱ्या गोष्टी उघड होताच पोलिसांनी मिथीलेशच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या त्याच्या तीनही मित्रांना अटक केली असून एमआयडीसी भोसरी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.