-MPC-TOP-MOST-BANNER-I

Moshi News: कंपनीच्या कॉन्फरन्स हॉलमधून एलइडी टीव्ही चोरीला

फिर्यादी आनंदकुमार यांची मोशी येथे ज्योती टुलिंग अँड प्रेस कंपोनंटस प्रा. लि. ही कंपनी आहे. या कंपनीच्या कॉन्फरन्स हॉलमधून अज्ञात चोरट्यांनी 15 हजार रुपये किमतीचा 127 सेमी एलइडी टीव्ही चोरून नेला.

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – कंपनीच्या कॉन्फरन्स हॉलमधून अज्ञात चोरट्यांनी एलइडी टीव्ही चोरून नेला. ही घटना मोशी येथील ज्योती टुलिंग अॅंड प्रेस कंपोनंटस या कंपनीत 22 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट या कालावधीत घडली.

आनंदकुमार प्रेमकुमार मळळा (वय 37, रा. आल्हाटवस्ती, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंदकुमार यांची मोशी येथे ज्योती टुलिंग अँड प्रेस कंपोनंटस प्रा. लि. ही कंपनी आहे. या कंपनीच्या कॉन्फरन्स हॉलमधून अज्ञात चोरट्यांनी 15 हजार रुपये किमतीचा 127 सेमी एलइडी टीव्ही चोरून नेला.

हा प्रकार 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा ते 24 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ या कालावधीत घडला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.