Moshi News: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – बहिणीकडे दुचाकीवरून जात असलेल्या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 21) रात्री नऊ वाजताच्या सुमारास मोशी टोलनाक्याजवळ घडली.

सचिन पुंडलिक बुरुड (वय 21, रा. शेरेवाडी, आव्हाट, ता. खेड, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी संदीप रामभाऊ बुरुड (वय 35, रा. कोंडवे- धावडे, खडकवासला) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा चुलत भाऊ सचिन बुरुड हा शुक्रवारी (दि. 21) त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी शेरेवाडी येथून च-होली येथे जात होता. रात्री नऊ वाजताच्या सुमारास मोशी टोल नाक्याजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. यात सचिन हा गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर आरोपी वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच जखमी सचिन याला रुग्णालयात दाखल न करता पळून केला. पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.