Sharad Pawar Tested Positive : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा जेष्ठ नेते शरद पवार यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज – तिस-या लाटेत कोरोना संसर्ग अनेकांना आपल्या जाळ्यात ओढत, अनेक नेते मंडळींना कोरोनाची लागण होत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा जेष्ठ नेते शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

शरद पवार यांनी काही वेळापूर्वी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत आपली कोरोना चाचणी सकारात्मक आल्याची माहिती दिली आहे. ‘माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे, त्यांचे पती व मुलीला देखील कोरोना संसर्गाची लागण झाली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.