Mp shrirang Barne: 1 हजार 83 नागरिकांना एकाच छताखाली विविध योजनांचा लाभ, विनामोबदला दाखले

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून 'शासन आपल्या दारी, जत्रा शासकीय योजनांची' हा उपक्रम

एमपीसी न्यूज – केंद्र, राज्य सरकारच्या विविधता (Mp shrirang Barne) योजनांचा लाभ लाभ थेट आणि सुलभ व्हावा, सर्व दाखले सहजरित्या मिळावेत यासाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून ‘शासन आपल्या दारी, जत्रा शासकीय योजनांची’ या वडगाव येथे घेतलेल्या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 1 हजार 83 नागरिकांनी एकाच छताखाली कोणतेही शुल्क न देता विविधता दाखले, लाभ मिळविले. शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले, बचतगटांना अनुदान, गर्भवतींना माता किटचे वाटप करण्यात आले.

खासदार बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव मावळ येथील भेगडे लॅानमध्ये आज सोमवारी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेतला. कार्यक्रमास प्रांताधिकारी सुभाष बागडे, तहसिलदार विक्रम देशमुख ,कृषी आधिकारी दत्ता पडवळ, गटविकास अधिकारी सुधिर भागवत, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, भाजपचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेश खांडभोर, शांताराम कदम, मुरलिधर मोहोळ, सुनिल हगवणे, सुनिल मोरे, धनंजय नवघणे यांच्यासह नागरिक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्र सरकार, राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता नागरिकांना विविध दाखल्यांची आवश्यकता असते. यासाठी नागरी सुविधा केंद्र आणि अन्य शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. दाखल्याअभावी नागरिक योजनांच्या लाभापासून वंचीत राहतात. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदार संघनिहाय ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यास सुरूवात केली आहे.

 Alandi : आळंदी नगरपरिषदेची ‘माझी वसुंधरा’ अभियानात उत्तम कामगिरी

त्यानुसार खासदार बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव येथे हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत नागरिकांना तत्काळ दाखले देण्यात आले. एकाच ठिकाणी विविध दाखले मोफत मिळाले. शेतकऱ्यांना (Mp shrirang Barne) ट्रॅक्टर, अवजारे वाटप करण्यात आले, बचतगटांना अनुदान, गर्भवतींना माता किटचे, पोषण आहार, पाठयपुस्तके, राज्यस्तरीय पीक स्पर्धेतील उत्कृष्ट, विजेत्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देण्यात आला.


1 हजार 83 नागरिकांनी घेतला लाभ –

रेशनकार्ड 157, संजय गांधी योजना 22, उत्पन्न, रहिवासी, जातीचे दाखले 65, नवीन मतदार नोंदणी 97, आधार कार्ड अद्यावत करणे 113, पीएम किसान लाभार्थी यांचे पोस्ट खाते अद्यावत करणे 145, भात पीक स्पर्धा 8, शेततळे वाटप 5, पॉली हाऊस वाटप 8, कृषी अवजारे वाटप 26, पाठयपुस्तक वाटप 30, पूरक आहार वाटप 32, महिला बचत गट निधी वाटप (प्रत्येकी 60 हजार रुपये) 30, घरघटी योजना अनुदान वाटप (प्रत्येकी 10 हजार 800) 19, आरोग्य तपासणी 176, जन्म प्रमापत्र 39, मृत्यू प्रमाणपत्र 26, मिळकत हस्तांतरण 36, झोन दाखले 12, जेष्ठ नागरीक पास 18 अशा 1 हजार 83 नागरिकांनी लाभ देण्यात आला.


नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठीचे दाखले मिळविण्याकरिता सरकारी कार्यालयात खेटा माराव्या लागतात. लोकांना शासनाच्या दारी जायला लागू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शासनालाच लोकांच्या दारी घेवून जात आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना विनामोबदला दाखले एकाच छताखाली मिळत आहेत. शासकीय योजनांचा लाभ घेणे सोपे होत आहे. निराधार महिलांना लाभ मिळत आहे. याचा मनस्वी आनंद होत आहे. हा उपक्रम यापुढेही राबविला जाईल. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित लोकांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचा मोठा कार्यक्रम घेतला जाणार आहे.

– श्रीरंग बारणे, खासदार मावळ


‘शासन आपल्या दारी, जत्रा शासकीय योजनांची’ या उपक्रमांतर्गत 1 हजार 83 नागरिकांना विविध योजनांचा लाभ, दाखले देण्यात आले. विविध विभागांचे 16 स्टॉल लावले होते. नागरिकांकडून विविध योजनांसाठीचे अर्ज भरून घेण्यात आले. पूर्वी ज्यांनी अर्ज केले होते, त्यांना लाभ देण्यात आला. दाखल्याचे वाटप करण्यात आले.

-विक्रम देशमुख, तहसीलदार मावळ


हे दाखले मिळाले विनामूल्य!

‘शासन आपल्या दारी’ उपक्रममाच्या माध्यमातून उत्पन्नाचा दाखला, नवीन मतदार नोंदणी, रेशनकार्ड, उत्पानाचे पत्र, रहिवासी दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, सातबारा, 8-अ वाटप, जातीचा दाखला, वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व दाखला (डोमिसाईल), 33 टक्के महिला आरक्षण दाखला, ज्येष्ठ नागरिकत्व दाखला, आधार कार्ड नवीन दुरूस्ती व अपडेट करणे, मतदान कार्ड आधारकार्डशी लिंक करणे, रेशनकार्डवरील नाव कमी करणे, रेशनकार्डवरील नाव वाढवणे, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना, आर्थिकदृष्या दुर्बल घटक दाखला (खुल्या प्रवर्गाकरिता), नॉन क्रिमिलिअर / उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबतचा दाखला एकाच छताखाली मिळाले आहेत. विशेष म्हणजे, या दाखल्यांसाठी नागरिकांकडून कोणतेही शूल्क आकारले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.