Mulshi Crime : मंदिरात कुत्रे आणले म्हणून तिघांकडून व्यावसायीकाला मारहाण

एमपीसी न्यूज – मंदिरात कुत्रे आणले (Mulshi Crime) म्हणून व्यावसायिकाला तिघांनी मारहाण केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.8) मुळशी येथील काळुबाई मंदिरात घडली आहे.

अभिषेक सुरेंद्रकुमार भारद्वाज (वय 35 रा.दत्तवाडी, मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली असून तीन अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PMPML : पीएमपीएमएल चालकाला पुन्हा बेदम मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा कुत्रा घेऊन काळुबाई मंदिरात (Mulshi Crime) बसले असताना अनोळखी तीन इसम तेथे आले व त्यांनी तू या मंदिरात तुझ्याकडील कुत्रे घेऊन यायचे नाही, असे बोलून फिर्यादीला लाकडी काठीने व नारळाच्या झाडूने फिर्यादीच्या डाव्या हातावर मारहाण करून गालावर जोरात झापड मारून शिवीगाळ केली. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.