Pune Crime : दुसऱ्यांच्या मैत्रिणींना घेऊन फिरतोस काय? असे म्हणत अल्पवयीन मुलाकडून एकाचा खून

एमपीसी न्यूज : 17 वर्षीय अल्पवयीन मुलांनी चाकूने (Pune Crime) छातीवर तोंडावर आणि डोक्यात वार करून एका 19 वर्षीय मुलाचा खून केला. पुण्यातील तळजाई टेकडी परिसरात गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला. मयत तरुण मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी गेला असता हा प्रकार घडला आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत.

साहिल चांगदेव कसबे (वय 19) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, आरोपी करण उर्फ सोन्या रवी वाघमारे (वय 18) आणि गौरव गोकुळ केंद्रे (वय 20) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर, दोन अल्पवयीन आरोपींना देखील ताब्यात घेतले आहे. अनिकेत चांगदेव कसबे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

Mulshi Crime : मंदिरात कुत्रे आणले म्हणून तिघांकडून व्यावसायीकाला मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत साहिल कसबे हा त्याच्या (Pune Crime) मित्र आणि मैत्रिणी सोबत सदू शिंदे क्रिकेट मैदानाजवळ गप्पा मारत थांबला होता. यावेळी त्याच्या तोंड ओळखीचे असलेले आरोपी हातात बांबू घेऊन त्या ठिकाणी आले. आरोपी करण वाघमारे यांनी साहिल याची गचांडी पकडून तू भाई झालास का? दुसऱ्यांच्या मैत्रिणींना घेऊन फिरतोस काय असे म्हणून आरोपींनी त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तर, एका 17 वर्षाच्या अल्पवयीन आरोपीने चाकूने त्याच्या छातीवर डोक्यावर आणि तोंडावर वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने साहिल याचा मृत्यू झाला आहे. सहकार नगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.