शनिवार, ऑगस्ट 20, 2022

Mumbai News : अक्षय कुमार नंतर अभिनेता गोविंदालाही झाली कोरोनाची बाधा

एमपीसी न्यूज – खिलाडी अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्याने स्वतः आज (रविवारी) सकाळी दिली होती. त्यानंतर अभिनेता गोविंदाही कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे.

अभिनेता गोविंदा यांचा अधिकृत प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार गोविंदाची कोरोना चाचणी सकारात्मक आली असून, त्याला सौम्य लक्षणे आहेत. तो सध्या होम क्वारंटाईन आहे.

दरम्यान, आज सकाळी अभिनेता अक्षय कुमार याने त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. त्यानंतर पार्श्वगायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण याला कोरोनाची बाधा झाली आहे. आणि आता अभिनेता गोविंदाही कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे.‌

spot_img
Latest news
Related news