Mumbai News : इंद्राणी मुखर्जी साडेसहा वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर

एमपीसी न्यूज – शीना बोरा हत्याकांडातील प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली इंद्राणी मुखर्जी साडेसहा वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आली. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजून 35 मिनिटांनी त्या भायखळा तुरुंगातून बाहेर आल्या.

साडेसहा वर्षांनंतर शिना बोरा हत्याकांड प्रकरणात इंद्राणी मुखर्जी यांना जामीन मिऴाला आहे.साडेसहा वर्षांनंतर मुखर्जी यांनी तुरुंगाबाहेर पाऊल ठेवले आहे. त्यांची छबी टिपण्यासाठी तुरुंगाच्या बाहेर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी होती. इंद्राणी मुखर्जी यांनी तुरुंगाबाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या कॅमेराकडे पाहून स्मितहास्य केले. आज मै बहुत खूश हू, अशी प्रतिक्रिया दिली.

खटला लवकर संपण्याची शक्यता नसताना सुमारे साडेसहा वर्षांचा तुरुंगवास झाला आहे, या कारणाखाली सर्वोच्च न्यायालयाने इंद्राणी मुखर्जी यांना बुधवारी जामीन मंजूर केला. यानंतर विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुवारी त्यांच्या जामिनावरील सुटकेचा आदेश काढला.त्यानुसार दोन लाख रुपयांच्या रोखीच्या वैयक्तिक हमीवर त्यांची भायखऴा तुरुंगातून सुटका झाली.

इंद्राणीला अटी कोणत्या?

सीबीआय न्यायालयाच्या परवानगीविना देशाबाहेर जायचे नाही, तसेच पासपोर्ट सीबीआयकडे जमा करावा, अशा प्रमुख अटी इंद्राणी यांना घालण्यात आल्या आहेत.

जामिनावर सुटका झाल्यानंतर स्वतःचा निवासी पत्ता आणि संपर्क क्रमांकाचा सर्व तपशील सीबीआयला द्यायचा आणि त्यात बदल झाला तरी तो कळवायचा, असेही सांगण्यात आले आहे. सरकारी पक्षाच्या कोणत्याही साक्षीदारांवर दबाव आणायचा नाही किंवा त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही, अशीही अट घालण्यात आली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.